बिस्किटे खाऊ घालणाऱ्या महिलेवरच माकडाने केला हल्ला; महिला गंभीर जखमी, 10 टाके पडले

मुंबई : मुंबईतील मालाड येथील एका ५९ वर्षीय महिलेला माकडाची दया दाखवून त्याला बिस्किटे खाऊ घातल्याची मोठी किंमत मोजावी लागली. माकडाने अचानक त्या दया दाखवणाऱ्या महिलेवर हल्ला केला. या घटनेत महिलेच्या चेहऱ्याला 10 टाके पडले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील मालाड पूर्वेतील अप्पापाडा येथे ही घटना घडली.

पिडीत सरोज शुक्ला या त्यांच्या आईस्क्रीम आणि सोडाच्या दुकानात होत्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, माकड येऊन आईस्क्रीम फ्रिजवर बसले, त्यानंतर शुक्ला यांनी त्याला बिस्किटे दिली. मात्र माकडाने बिस्किटे खून तिच्या हल्ला केला, त्यामुळे महिला जखमी झाली.

तेथे उपस्थित लोकांनी शुक्ला यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना १० टाके पडले. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसर्‍या स्थानिकाने सांगितले की, माकडाने शुक्रवारी एका मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी झाला.त्याचबरोबर स्थानिक नागरिकांमध्ये माकडाची दहशत आहे. या माकडाला लवकरात लवकर पकडण्यात यावे, असे लोकांचे म्हणणे आहे.