Nana Patole | कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय, नव्या वादाला फुटले तोंड

Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांनी पाय धुतल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाल्याचे देखील बोलल्या जात आहे. या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चेला पेव फुटले.

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते. नाना पटोले यांची लाडूतूला होती. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना नाना पटोलेंचे (Nana Patole) पाय चिखलाने माखले.

त्यानंतर ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like