जगातील पहिला मराठी-हॉलिवूड चित्रपट. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

पुणे: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजवर विविध पथडीतील भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. लवकच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय. यासोबतच सोनालीने मराठी प्रेक्षकांना एक मोठी आनंदाची बातमी दिलीय.

‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेल्या ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ’ ज्यांनी याआधी साय-फाय चित्रपट केले आहेत ज्यात बॅालिवूडच्या ‘रा वन’या चित्रपटाचाही समावेश आहे, ही चित्रपट निर्मिती संस्था आणि ‘ओरवो स्टुडिओ’ आता ‘मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. क्षतेही ऐतिहासिक चित्रपटातून.

चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’च्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी.  त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. अशा या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी’ हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची सोशल मीडियावर भावुक पोस्ट

Next Post

पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Related Posts
student

कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही; #UPSC चा मोठा निर्णय

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी स्पष्ट केले की नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2021 शुक्रवारपासून त्याच्या वेळापत्रकानुसार…
Read More
Chandrakant Patil

तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha elections) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप…
Read More
पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या सुमन काळेंना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रा वाघ यांनी लिहिले थेट गृहमंत्र्यांना पत्र 

पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या सुमन काळेंना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रा वाघ यांनी लिहिले थेट गृहमंत्र्यांना पत्र 

मुंबई – भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राची सध्या…
Read More