Shivraj Rakshe | अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गादी विभागातील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या कुस्तीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पंच नितीश कबालिये यांच्यावर कारवाई करत त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली.
या निर्णयानंतर महाराष्ट्र केसरीचे आयोजक संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली की, 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली होती. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. आम्ही या सगळ्याला लक्षात घेऊन विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले. 28 फेब्रुवारीला या समितीचा अहवाल मिळाला.
मागच्या आठवड्यामध्ये कुस्ती संघाची ऑनलाईन बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये त्या पंचांची चूक आहे असे अहवालात निदर्शनास आले. त्यामुळे बैठकीमध्ये आम्ही पंच यांच्यावर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली. महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई, पण एकदा निकाल दिल्यानंतर तो बदलता येत नाही. यामध्ये पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही. पण पंचानी काय निर्णय द्यावा हा त्यांचा निर्णय असतो. महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याची कारवाई आम्ही मागे घेतली.
परंतु शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) यांनी अशा प्रकारचे पत्र दिलं नाही. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. जर त्यांनी पत्र दिलं आणि तर आम्ही निश्चितच सगळे सदस्य बसून कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू, असे आस्वासन भोंडवे यांनी दिले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?