शिंदेंसोबत 50 आमदार आहेत, ते आजही मनाने आपलेच आहेत, शिंदेंशीही जुळवू घेतलं पाहिजे; खासदारांची ठाकरेंकडे मागणी

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका शिवसेनेच्या महाराष्ट्रातल्या 18 पैकी 16 खासदारांनी मांडली आहे. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) येत्या एक दोन दिवसात भूमिका मांडतील अशी माहिती शिवसेना खासदार गजानन किर्तीकर (Shiv Sena MP Gajanan Kirtikar) यांनी दिली आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात भाजप आणि शिंदेशी जुळवून घ्या अशी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे तर राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर चर्चेची भाजपसोबत दारं उघडी राहतील असंही त्यांनी आजच्या बैठकीत सांगितले आहे.

देशात भाजपनं मोठी ताकद निर्माण केली असून आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, शिंदेंसोबत 50 आमदार आहेत, ते आजही मनाने आपलेच आहेत, शिंदेंशीही जुळवू घेतलं पाहिजे अशा प्रकारची मागण्या वजा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारांनी केल्या आहेत.