मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत; युतीत मात्र शिंदे-पवारांच्या जागांवरही भाजपाचेच उमेदवार | Ramesh Chennithala

मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत; युतीत मात्र शिंदे-पवारांच्या जागांवरही भाजपाचेच उमेदवार | Ramesh Chennithala

Ramesh Chennithala | महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची भाजपाची ही सुरुवात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला आहे.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकारने दोन वर्ष महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता जाता युती सरकारने भरमसाठ निर्णय जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी भाजपा युती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेने केला आहे. आता भाजपायुतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“कोथरूडकरांचे आरोग्यदूत: चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवा मजबूत” | Chandrakant Patil

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली, ‘या’ जागांवर मविआत मैत्रीपूर्ण लढत

रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार, पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

Previous Post
आता थायलंडमध्ये उभारले जाणार प्रति 'दगडूशेठ' गणपती मंदिर

आता थायलंडमध्ये उभारले जाणार प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

Next Post
मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत, मैत्रिपूर्ण लढतही होणार नाही; रमेश चेन्नीथलांची स्पष्टोक्ती

मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत, मैत्रिपूर्ण लढतही होणार नाही; रमेश चेन्नीथलांची स्पष्टोक्ती

Related Posts
Neelam Gorhe | उबाठा गटाने सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली, नीलम गोऱ्हे यांची टीका

Neelam Gorhe | उबाठा गटाने सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली, नीलम गोऱ्हे यांची टीका

Neelam Gorhe | उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली असून त्यांनी अतिशय…
Read More

‘महाराष्ट्रात वाईन म्हणजे दारू नाही’, आरोह वेलणकरने अजित पवारांना घेतलं फैलावर

पुणे : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More
दिवस फिरले : भाजपच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश;आगामी निवडणुकीत भाजपला दणका देणार

दिवस फिरले : भाजपच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश;आगामी निवडणुकीत भाजपला दणका देणार

Laxman Savadi : कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी नेते आणि…
Read More