तिर्थक्षेञी वाहनतळ ठेकेदार मालामाल वाहन चालकांचे होत आहेत हाल

तुळजापूर – श्री तुळजाभवानी दर्शनार्थ (Tulja Bhavani Devi) नाताळ सुट्यांच्या (Christmas) पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक खाजगी वाहनांनी आल्याने व वाहन ठेकेदार वाहनतळ पावती फाडून वाहने थेट शहरात सोडत असल्याने रविवारी (२५ डिसेंबर) वाहतुक नियोजन अभावी शहरात रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाताना व दर्शन करुन येताना याचा त्रास झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहतुक नियोजन वाहनतळ ठेकेदाराकडे द्यावी अशी मागणी होत आहे.

वाहनतळ ठेकेदार संबंधित सर्व प्रशासकीय यंञणा संगनमत असल्याकारणाने बेशिस्त वाहनाचे व वसुलीचा अंदाधुंद कारभार सुरु आहे. वाहनतळ ठेका अटी शर्तीचा भंग होताना त्याची दखल नगरपरिषद प्रशासन घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रविवारी तिर्थक्षेञ तुळजापूरात पंधरा ते वीस हजार चार-सहा चाकी वाहने आली होती.

त्यात वाहनतळ ठेकेदार कर्मचारी वाहने छञपती शिवाजीमहाराज पुतळा उस्मानाबाद रोड, राजपँलेस हाँटेल डाँ मलबा हाँस्पीटल येथे वाहनतळ पावती फाडुन वाहने आत सोडत होते. यात बहुतांशी वाहने हे घाटशिळ रोड वाहनतळाकडे दिपक चौकातून जात होते व घाटशिळ रोड वाहनतळातून दिपक चौकातून बाहेर पडत होते. वाहने आत जाण्यासाठी बाहेर येण्यासाठी दिपक चौक रस्ता वापर करीत असल्याने छञपती शिवाजीमहाराज पुतळा ते दिपक चौक ते घाटशिव रोड या रस्त्यावर दिवसभर वाहतुक कोंडी होत होती. वाहन चालकांकडून पैसे वसूल करुन वाहनतळ ठेकेदार नामानिराळी राहत असल्याचा आरोप भाविकांकडून होत होता.