शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीचा वरवंड येथे अपघात; सावंत यांच्या गाडीचे झाले नुकसान

दौंड – शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांच्या गाडीचा पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur Highway) वरवंड गावच्या  हद्दीतील  कौठीचामळा येथे अपघात झाला . पोलीसांनी दिलेल्या आमदार  तानाजी सावंत हे गाडीतून  पुण्याकडे जात असताना , शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला . याबाबत तानाजी सावंत यांच्या गाडीचे चालक सोनबा शंकर देवकाते यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडाचे विधानसभा सदस्य तानाजी सावंत हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत  टोयटा कंपनीची लॅन्डक्रुझर कार (Toyota Land Cruiser) गाडी नं.(एम.एच.12/आर.एफ/6000 )  मधुन उस्मानाबाद येथुन सोलापुर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरून  पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते . यावेळी त्याच्या गाडीचे चालक  सोनबा देवकाते हे गाडी चालवत होते .

शनिवारी रात्री 11ः30 वाजण्याच्या सुमारास तानाजी सावंत यांची लॅन्डक्रुझर गाडी  वरवंड (ता.दौैंड ) गावच्या  हददीत कौठीचामळा येथे आली . तेंव्हा  समोर सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावर  डाव्या बाजुच्या लेनवरून एक कंन्टेनर (एन.एल.01/ए.डी/3395 ) वरील चालक हा त्याचे ताब्यातील कंन्टेनरच्या पाठीमागील बाॅडीवर बाॅडीच्या बाहेर अंदाजे 3 फुट एक मोठी मशीनरी ठेवुन घेवुन तसेच सदर वाहनास रिफलेक्टर नसताना चालवित पुणे बाजुकडे घेवुन होता . सदर कंटेनर चालकाने  त्याच्या पाठीमागुन येणा-या वाहनांची पाहणी न करता तसेच पाठीमागुन येणा-या वाहनांना कोणताही इशारा अगर इंडीकेटर न देता त्याने त्याची लेन सोडुन कंन्टेनर हा अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून धोकादायकरित्या अचानक रोडच्या उजव्या बाजुच्या लेनवर घेतल्याने  कंन्टेनरची क्लिनर बाजुची  टोयटा कंपनीची लॅन्डक्रुझर कारगाडीचे उजव्या बाजुला जोरात धडक बसुन अपघात झाला.

सदर अपघातात कोणास दुखापत झाली नाही. अपघातात आमदार तानाजी सावंत यांच्या लॅन्डक्रुझर  गाडीचे नुकसान झाले आहेे. कंन्टेनर (एन.एल.01/ए.डी/3395 ) वरील चालकाचे नांव रोहीत देविदास वाघमोडे (रा.रेवन सिध्देश्वर नगर, होटगी रोड, सोलापुर)  असे असुन सदरचा अपघात हा कंटेनर चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याबाबत तानाजी सावंत यांच्या गाडीचे चालक सोनबा शंकर देवकाते यांनी यवत पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालका विरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित इंगवले हे करीत आहेत .