नगरमध्ये कॉंग्रेसचे जुने दिवस येणार परत, पक्षात जोरदार इनकमिंग

अहमदनगर : काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच असून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे अहमदनगर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे जयप्रकाश छाजेड, भटके-विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे आदी उपस्थित होते.

अहमदनर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांच्यासह किरण शिंदे, संतोष धनगर, विजय शिंदे, अंकुश धनगर, चंदर शिंदे, गोरख धनगर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर लकीभाऊ जाधव यांच्यासोबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू गांगर, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दौलत मेमाणे, आदीवासी लोकगायक संदीप गवारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.