लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपात प्रवेश करणाऱ्या नवनीत राणा (Ravi Rana) यांना सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता नवनीत राणा यांचे पती रवी राणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. यातच भाजप नेत्याने आमच्या पक्षात राणा सारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही, असे वक्तव्य केल्याने राणांविरोधात भाजपात वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
रवी राणा (Ravi Rana) यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना व्यासपीठावर बोलावले होते. त्यांच्या समोरच मी भाजपात प्रवेश करणार नाही असे जाहीर केले होते. अशा वक्तव्यामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना आहे. राणा यांनी यापूर्वी मोदींचाही अपमान केला आहे. वेळ पडली तर हा व्यक्ती मविआसोबतही जाण्यास तयार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य तुषार भारतीय यांनी केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप