चंद्रपूर : तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एक आहोत महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. जेंव्हा भिन्न मत असतात तेव्हा आम्ही एकत्रित बसुन चर्चा करून निर्णय घेत असतो. आगामी काळात येणाऱ्या निवडणूका एकत्रित लढण्याचा सर्वांचा मानस आहे मात्र यासाठी आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ. असं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटल आहे.
चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यामार्फत कृतज्ञता सोहळा आयोजित केला होत त्यावेळी ते बोलत होते.
ओबीसींच्या आरक्षणासंबंधीत प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून महाविकास आघाडीही ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक आघाडीवर लढत राहणार .आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी आहोत त्यामुळे ओबीसी आरक्षणा संदर्भात आम्ही लढतच राहणार आहोत, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत.
तर, आज काही पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच ओबीसी समाजाला आरक्षणाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी विदर्भात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी आम्ही अध्यादेश काढला आहे. असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=DBZ9rSr33XU