आता माघार नाहीच…; चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम

Pune Bypoll election : चिंचवडचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आहे. त्यामुळे आता चिंचवडमध्ये (Chinchwad) तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतून राहुल कलाटे यांनी माघार घेण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. आज सकाळी शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी देखील कलाटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कलाटे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.

त्यामुळे भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी त्रिशंकू लढत होणार आहे. परिणामी, महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असून, भाजपाला फायदा होणार आहे असं दिसत आहे.