तीचा गुन्हा काय होता हे कळायला मार्ग नाही; निलंबित महिला कंडक्टरसाठी आव्हाड मैदानात

मुंबई – प्रसिद्धी(publicity) मिळवण्याच्या नादात अनेकदा नुकसान होऊन बसते हे वारंवार समोर येत असते. याचाच प्रत्यय आता एक लेडी कंडक्टरला(lady conductor) आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगल सागर पुरी या लेडी कंडक्टरवर ऑन ड्यूटी(on duty) असताना स्वतःचे व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर(social media) व्हायरल(viral) केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.तिच्यावर एसटी महामंडळानं (ST Corporation) निलंबनाची कारवाई केलीय. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे.

कळंबा आगारातील मंगल पुरींचा गुन्हा इतकाच की कंटक्टरचा ड्रेस घआलून त्यांनी इन्स्टा रील तयार केले. त्यांनी तुळजाभवानीच्या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. मात्र अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र त्यानंतर लगेचच घुमजाव करत ड्रायव्हर सीटवर बसून गैरवर्तन केल्याचा ठपका एसची महामंडळांनं ठेवलाय. इतकच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलंय.

दरम्यान, या महिला कंडक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले आहेत. ते म्हणाले, राज्य परिवहनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कंडक्टरने समाजमाध्यमांचा आधार घेत स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केला. पण अत्यंत तातडीने राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी तीला कामावरून निलंबित केले. तीचा गुन्हा काय होता हे मात्र कळायला मार्ग नाही.

 

अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी (महिला व पुरुष) त्ते संपूर्ण देशातून फेसबुक, ट्वीटर व इतर समाजमाध्यमांचा उपयोग करून स्वतः प्रसिद्धीच्या वर्तुळात राहत असतात.मग ह्या बस कंडक्टरने काय गुन्हा केला. दुसरं काही नाही हा वर्ग संघर्षाचा लढा आहे. तिला कामा वर परत घ्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.