प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही – अजित पवार 

 मुंबई : शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उघड विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी केला आहे. तसेच त्यांनी नुकतीच शरद पवारांवर देखील टीका केली होती.  यावर विरोधी पक्षनेते अजित पवार( Ajit pawar)) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही, असे त्यांनी म्हटले आहे.(There is no way to know why Prakash Ambedkar keeps doubting our party – Ajit Pawar) .

ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. आदरणीय शरद पवारसाहेबांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे(Prakash Ambedkar,  R.S. Gavai, Ramdas Athawale, Jogendra Kawade)  यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.