बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ होणार आता उपलब्ध

yashomati thakur

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो, दुबई येथे ‘माविम’ने एलबीआय जनरल ट्रेडिंग एलएलसी, बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शियल इन्व्हेस्टमेंट एलएलसी सोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. ‘मविम’ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी, महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून सुमारे 42,000 टन कृषी माल खरेदी होईल.या भागीदारीमुळे कांदा, तांदूळ, ताजी फळे आणि भाजीपाला या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. या सामंजस्य करारामुळे महिला शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेत आपला कृषी माल पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे. या तीन सामंजस्य करारांचे मूल्य जवळपास 60 ते 65 कोटी असण्याची अपेक्षा आहे, ज्याचा राज्यभरातील ५० हजार महिला शेतकऱ्यांना फायदा होईल.

ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी ‘माविम’कडून काम केले जाते. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, यांनी या सामंजस्य कराराबाबत व्यक्त केली. ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होत्या.

Previous Post
ipo

वर्षांचा शेवट होणार जोरदार, 10 मोठ्या कंपन्यांचे IPO बाजारात येणार

Next Post
NCP

भारिप व भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; कारंजा – मानोरा नगरपंचायतीचे २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचाही प्रवेश 

Related Posts
balasaheb thorat

मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल; बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य 

मुंबई – शिंदे-फडणवीसांचं सरकार राज्यात आल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे-फडणवीसांचं हे सरकार सहा महिनेच टिकेल…
Read More
देवेंद्र भुयार

राज्यात स्वाईन फ्लूने वाढवली चिंता, या आमदारालाही झाली लागण

मोर्शी – मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने (Swine flu) चिंता वाढवल्या आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचं टेन्शनही…
Read More
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान अडकला लग्नाच्या बेडीत | Rashid Khan Marriage

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान अडकला लग्नाच्या बेडीत | Rashid Khan Marriage

अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानने लग्न (Rashid Khan Marriage) केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये राशिदचे लग्न झाले. अफगाणी…
Read More