बचत खात्याला या पाच बँका देतात सर्वाधिक व्याजदर
फिक्स डिपॉजिटचे व्याज दर आता कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वजण पैसे जास्त करून बचत खात्यात ठेवत आहेत. बचत खात्यात पैसे ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. बचत खाते बँकेतील सर्वात सोयीस्कर आणि वापरायला सोप्पे खाते आहे. बचत खात्यात आपण अगदी सहज पैसे जमा करू शकतो. काढू शकतो. आणि त्यावर उत्तम व्याज देखील मिळते. आपले पैसे सुरक्षित राहतात, गरजेच्या वेळी लगेच काढता येतात.
सध्या अनेक बँका अगदी लहान – लहान ग्राहकांना देखील त्यांच्या बँकेकडे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण हे लहान ग्राहक देखील खूप महत्वपूर्ण आहेत . ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक व्याज दर देखील देण्यात येत आहेत. जसे की एचडीएफसी आणि आईसीआईसीआई बँक देखील उत्तम व्याजदर देत आहेत. आज आपण अशा पाच बँका पाहणार आहोत ज्या सर्वात उत्तम व्याजदर देतात.
डीसीबी बँक – ही बँक 6.5 टक्के व्याज देते. खाजगी बँकामध्ये ही सर्वाधिक व्याज देणारी पहिली बँक आहे. या बँकेमध्ये तुमच्या खात्यात कमीत कमी 2500 ते 5000 हजार रक्कम असावी लागते.
बंधन बँक – ही बँक 6 टक्के व्याज देते. यामध्ये खात्यामध्ये किमान 5000 हजार रुपये बॅलेन्स असणे गरजेचे आहे.
आरबीएल बँक – ही बँक देखील तुम्हाला 6 टक्के व्याजदर देते. तुमच्या खात्यात किमान 2500 ते 5000 हजार रक्कम असावी लागते.
यस बँक – ही बँक तुम्हाला 5.25 टक्के व्याज दर देते. या बँकेमध्ये तुमच्या खात्यात किमान 10, 000 हजार ते 25000 हजार बॅलेन्स असणे आवशक्य आहे.
आईडीएफसी फर्स्ट बँक – ही बँक तुम्हाला 5 टक्के व्याज देते. आईडीएफसी फर्स्ट मध्ये तुमच्या खात्यात किमान 10, 00 हजार रुपये तरी असणे जरूरी आहे.