शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर ‘या’ नेत्यांची लागू शकते वर्णी

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ज्यसभेच्या सहव्या जागेसाठी शिवसेनेकडून लढण्यास संभाजी राजे आणि नकार दिल्यास, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, रामदास कदम आणि काँग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. खैरे यांच्या मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इमतियाज जलील यांनी पराभव केला होता. या पराभवाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यथित झाले होते. हा पराभव केवळ खैरे यांचा नसून माझा पराभव आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे खैरे यांच्या नावाला पसंती असल्याचे शिवसेना गोटातून समजते. त्यापाठोपाठ शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ यांच्याबाबत पक्षांतर्गत विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे, पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.