Nikhil Wagle | “बोके आहेत ते. लोण्याचा गोळा मिळाल्याविना…”, निखील वागळेंचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंविषयी मोठे विधान

Nikhil Wagle | भाजपाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपीला एकत्र घेत मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. त्यातले मोदींसह ६१ खासदार हे भाजपाचे आहेत. एकूण ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र पदभार राज्यमंत्री तर ३६ राज्यमंत्र्यांचा मोदींच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये समावेश आहे. यात पूर्णपणे भाजपाचा वरचष्मा असला, तरी उरलेल्या १० खासदारांमध्ये टीडीपी आणि जेडीयू या मित्रपक्षांनाही महत्त्वाची मंत्रीपदं देण्यात आली आहेत. मात्र तरीही कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळू शकते, असा घणाघात विरोधकांकडून करण्यात येत आहे.

एनडीए सरकारने लोकसभेत बहुमत मिळवल्यापासून नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायुडू कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतात, असा दावा विरोधी इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नायडू किंवा नितीश लवकर सरकार पाडतील या भ्रमात राहू नका. बोके आहेत ते. स्वतःचा लोण्याचा गोळा मिळाल्याविना काही करणार नाहीत!, अशा शब्दांत निखील वागळेंनी आपले मत मांडले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप