ब्राह्मण समाज शरद पवारांवर का नाराज आहे याची कल्पना त्यांना नाही ? 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांकडून (NCP President Sharad Pawar) राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना (Brahmin organizations) चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर(social media)  काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या (Aanand Dave) ब्राह्मण महासंघासह प्रमुख संघटनांचा विरोध केला आहे. मात्र इतर छोट्या मोठ्या संघटना आणि या समाजाचे कथित नेतृत्व करणारे लोकं चर्चेसाठी जाणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (District President of NCP Pradip Garatkar) यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय (Nisarg Mangal Karyalay) येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांना आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर यांनी केला.

दरम्यान, राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असताे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. राज्यातील बहुतांश ब्राह्मण संघटनांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये राजकारण वाटत आहे. मात्र संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे आयोजक, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. मात्र, केतकी चितळे प्रकरण, अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांच म्हणणं असं आहे की, तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण सांगावं, असा दावा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे.

पवारांना पूर्ण कल्पना आहे की, आपली नाराजी का आहे. समर्थ रामदास, कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी,संभाजी ब्रिगेड,श्रीमंत कोकाटे,बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू .पण अगदी परवाच्या प्रकरण नंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना शब्द माघार घ्यायला सांगायचं होतं. पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली, त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली, आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले, असंही दवे म्हणाले.