ते लोक साहेबांचा खून सुद्धा करतील; राष्ट्रवादीच्या नेत्याची खळबळजनक पोस्ट

पुणे – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Staion) गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे (Vikas Lavande) यांनी केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, सर्व संघीष्ट लोकांना अनेक वर्षांपासून मा.शरद पवार साहेबांची खूप अडचण आहे. मागील 2 वर्षात त्यांना जास्तच अडचण झालेली आहे. म्हणून साहेबांची कायम व्यक्तिगत बदनामी करणे , खालच्या पातळीवर येऊन वाह्यात टीका करणे. प्रसंगी ते लोक साहेबांचा खून सुद्धा करतील. इतिहासात त्यांनी अनेक खून पचवले आहेत. आत्ताच्या काळात याचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मोहन भागवत (Mohan Bhagwat) आहेत. मा.पवार साहेबांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. असं लवांडे यांनी म्हटले आहे.