या अॅपमुळे थांबणार रेशन कार्डचा काळा बाजार

वन नेशन वन रेशन कार्ड या योजनमधून मोदी सरकारने माझे रेशन अॅप लॉंच केले आहे.या अॅपच्या मदतीने रेशन कार्ड काढणे सोप्पे होणार आहे. त्यामुळे आता दलाला पैसे देऊन रेशन कार्ड काढण्यापेक्षा तुम्ही स्वता अगदी मोफत घरबसल्या रेशन कार्ड काढू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सर्व कामे करू शकता. नवीन रेशन कार्डची नोंदणी करू शकता. नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड देखील लिंक करू शकता.

आता पर्यत तुम्हाला किती धान्य वितरित झाले आहे, हे देखील पाहू शकता. तुमच्या परिसरात तुमच्या जवळ कोठे धान्य उपलब्ध आहे, हे देखील पाहू शकता. तुम्हाला जर तुमचा स्वस्तधान्य दुकानदार बदलायचा असेल तर ते देखील करू शकता. या अॅपमुळे तुमचा वेळ आणि पैसा हे देखील वाचणार आहे. पुर्वी रेशन कार्ड काढणे म्हणजे अगदी जिकरीचे काम समजले जात, त्यासाठी अनेक कागदपत्रे देखील लागत, मात्र आता तुम्ही अगदी घर बसल्या अगदी कमीत- कमी कागदपत्रे सादर करून रेशन कार्ड काढू शकता.

तसेच लगेच डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड देखील करू शकता. जर तुम्ही इतर राज्यात स्थलांतरित झाला असाल तरी देखील तुम्ही तुमचे रेशन कार्ड अवघ्या काही वेळेत अपडेट करू शकता. तुम्हाला यासाठी माझे रेशन हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. जेव्हा तुम्ही हे अॅप डाऊनलोड कराल तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल.