भाजपच्या वयोवृद्ध आमदाराला व्हिडिओ कॉल करून महिलेने केले ‘हे’ घाणेरडे कृत्य

चित्रदुर्ग – कर्नाटकातील एका वयोवृद्ध भाजप आमदाराने एका महिलेने अश्लील कृत्य केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते जीएच थिपरेड्डी (75) हे पाच वेळा आमदार आहेत. सध्या ते चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्याला एक व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये एका महिलेने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. फोन कट झाल्यानंतर फोन करणाऱ्याने एक अश्लील व्हिडिओही शेअर केल्याचे आमदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. फोन करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

थिपरेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कॉल आला तेव्हा कॉलरने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. काही मिनिटांनी त्याला दुसरा फोन आला ज्यामध्ये एका महिलेने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. एका पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

फोन करणाऱ्या महिलेचा उद्देश काय होता आणि ती असे का करत होती, हे समजले नसल्याचे आमदार सांगतात. चित्रदुर्ग सायबर क्राईम पोलिसांनी लैंगिक सामग्रीचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण केल्याबद्दल आयटी कायदा, 2000 च्या कलम 67A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.