‘एकनाथ शिंदे याचं हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे’

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू, आणि शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का..? भुजबळांनी बाळासाहेबाना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे (Subhash Sabne)  यांनी उद्धव याना थेट सवाल केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांच्या विरोधात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला. पंढरपूरची पोटनिवडणुक लागली त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात अली, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं. आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली. एकनाथ शिंदे यांच हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे.