महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झालंय – नाना पटोले

Narendra Modi - Nana Patole

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपाने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या–जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पटोलेंनी केले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=uS6auH2ZXZ8

Previous Post
विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही – अजितदादा

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही – अजितदादा

Next Post
Nana Patole And Sameer Wankhede

मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ – नाना पटोले

Related Posts
women's health

महिलांनी तिशीनंतर आरोग्याबाबत सावध राहावे, अन्यथा त्या ‘या’ आजारांना बळी पडू शकतात

वयाच्या 30 व्या वर्षी महिलांच्या (Women) शरीरात अनेक बदल घडू लागतात. वास्तविक, आजच्या काळात वाढत्या वयाबरोबरच पुरुषांच्या (Men)…
Read More
modi-shah

पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे; कॉंग्रेसची मागणी

मुंबई –  पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी 15 दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती…
Read More
एअरटेलच्या टीम लीडरला मनसेनं धु-धु धुतलं; जाणून घ्या पुण्यात नेमकं घडलं काय

एअरटेलच्या टीम लीडरला मनसेनं धु-धु धुतलं; जाणून घ्या पुण्यात नेमकं घडलं काय

Ashish Sable Patil | वाकडेवाडी येथील एअरटेलच्या शोरूममध्ये मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या टीम लीडर शाहबाज अहमदला महाराष्ट्र नवनिर्माण…
Read More