केरळमधील या महिलेला तिच्या मिशा आवडतात, काय आहे कारण जाणून घ्या

केरळ –  तुम्ही नेहमी पुरुषाच्या चेहऱ्यावर मिशा पाहिल्या असतील,मात्र स्त्रियांची थोडीशी मिशी (लेडीज अप्पर लिप्स हेअर) देखील त्यांचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करते. पण याउलट एक महिला (Women) अशी आहे जिला आपल्याला मिशा असल्याचा अभिमान आहे.

होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, केरळची (Kerala) राहणारी शायजाला तिला तिच्या पूर्ण वाढलेल्या मिशा ठेवायला आणि दाखवायला आवडतात. कन्नूर जिल्ह्यातील शायजाला  खरं तर, पाच वर्षांपूर्वी शायजाच्या लक्षात आलं की तिच्या ओठावरचे हलके केस आता मिशीसारखे जाड होत आहेत आणि मग शायजाने मिशी ठेवण्याचा निर्णय घेतला.

आता शायजा तिच्या पूर्ण वाढलेल्या मिशा दाखवण्यास मागेपुढे पाहत नाही. स्त्रीच्या चेहऱ्यावरचे केस साधारणपणे अनाकर्षक मानले जात असले तरी, ३५ वर्षीय शायजा हिला तिच्या मिशा आवडतात. सोशल मीडियावर तिची छायाचित्रे पाहणाऱ्या किंवा भेटणाऱ्या लोकांना ती मिशी का वाढवते याची उत्सुकता असते. लोकांनी तिला मिशा काढण्यासही सांगितले, पण  तिने नकार दिला.  मी सुंदर नाही असे मला कधीच वाटले नाही, असे शायजा म्हणाली.

शायझाचे कुटुंबीय आणि मित्र तिच्या मिशांचे समर्थन करतात आणि तिची मुलगी तिला सांगते की या मिशा तिच्यावर छान दिसतात. तथापि, असे लोक आहेत जे शायझा मिशा वाढवण्याबद्दल टीका करतात. काहीही असलं तरी, शायजाला तिच्या मिशांवर एवढे प्रेम आहे की मी माझ्या मिशाशिवाय जगू शकत नाही, असं ती अभिमानाने सांगते.