काही आयएएस किंवा काही मेकॅनिकल इंजिनिअर, हे भारताचे 8 सर्वात सुशिक्षित क्रिकेटपटू आहेत

मुंबई : भारताने सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सारखे अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू जागतिक क्रिकेटला दिले आहेत. या खेळाडूंमुळेच भारताची एक वेगळी ओळख क्रिकेट विश्वात निर्माण झाली मात्र आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा 8 क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना देशातील सर्वात सुशिक्षित क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते.

अमेय खुरासिया (IAS अधिकारी)

भारतासाठी 12 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या अमेय खुरासियाने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. पदार्पण सामन्यात 45 चेंडूत 57 धावांची धमाकेदार खेळी खेळणारा अमेय खुरासिया भारताचा सर्वात सुशिक्षित क्रिकेटपटू आहे. त्याने भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी IAS परीक्षा उत्तीर्ण केली होती.

राहुल द्रविड (एमबीए)

जागतिक क्रिकेटमध्ये भारताची भिंत म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड हा केवळ जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक नाही तर भारतातील सर्वात सुशिक्षित क्रिकेटपटूंपैकी एक आहे. राहुल द्रविडने सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बंगळुरू येथून एमबीए केले आहे.

अनिल कुंबळे (मेकॅनिकल इंजिनीअर)

अनिल कुंबळे (619) मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708) नंतर कसोटी विकेट्ससाठी जगातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कुंबळे यांनी ‘राष्ट्रीय विद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय’, बंगळुरू येथून मेकॅनिकल इंजिनीअर केले आहे.

जवागल श्रीनाथ (इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता)

भारतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक, जवागल श्रीनाथ हे सुशिक्षित क्रिकेटपटू आहेत. श्रीनाथ यांनी ‘श्री जयचमाराजेन्द्र अभियांत्रिकी महाविद्यालय’, म्हैसूर येथून ‘इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग’ केले आहे. भारतासाठी त्याने 67 कसोटीत 236 आणि 229 एकदिवसीय सामन्यात 315 विकेट्स घेतल्या आहेत.

रविचंद्रन अश्विन (आयटी अभियंता)

सध्या भारताचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चेन्नईच्या ‘एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ मधून B.Tech (IT Engineering) केले आहे. अश्विनने आतापर्यंत भारतासाठी 75 कसोटीत 386 विकेट, 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 विकेट आणि 46 टी -20 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत.

अविष्कर साळवी (खगोल भौतिकशास्त्रात पोस्ट डॉक्टरेट)

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कर साळवी देशासाठी फक्त 4 एकदिवसीय सामने खेळू शकला. एका क्षणी त्याला भारताचे ग्लेन मॅकग्रा असेही म्हटले जायचे. पण दुखापतीमुळे त्याची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. साळवी यांच्याकडे ‘खगोल भौतिकशास्त्र’ मध्ये डॉक्टरेट आहे.

मुरली विजय (अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान पदवी)

कसोटी सलामीवीर मुरली विजय, ज्याने आतापर्यंत भारतासाठी 61 कसोटी सामने आणि 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत, तो सुशिक्षित क्रिकेटपटू आहे. मुरलीकडे ‘अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान’ पदवी आहे.

अजिंक्य रहाणे (B.Com)

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा अत्यंत हुशार क्रिकेटपटू मानला जातो, त्याने बी.कॉम केले आहे. रहाणेने भारतासाठी आतापर्यंत 68 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी -20 सामने खेळले आहेत.

हे ही पहा: