लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे ‘त्यांचं’ गुणगान गातायत – प्रणिती शिंदे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले होते. या भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला झोडपल्याने सत्ताधारी नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. यातच आता कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसे ही भाजपला सी टीम मिळाली आहे. एकेकाळी भाजप विरोधात ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणारे त्यांचे गुणगान गात आहे. (Praniti shinde on raj Thackeray) निवडणुकीदरम्यान हे सर्व मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे मागे टाकतात. महागाई सारखी मुद्दे सोडून असे मुद्दे धरायचे याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करत असल्याची टीका प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी सोलापुरात केली.