ज्यांना गद्दारी करायची त्यांनी खुशाल शिवसेना सोडावी, उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खास ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. अमित शहा म्हणाले एकट्याने लढा आमची एकट्याने लढण्याची तयारी आहे. आधी आव्हान देऊन ईडी वगैरे ससेमिरा लावायचा. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, इतर राज्यात सुध्दा शिवसेना निवडणुका लढवते. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही आणि विजयाचा उन्माद करायचा नाही असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांक वर असलो तरी आम्ही जागा किती लढवल्या अगदी युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या.

तर, आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हवे. इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. लढाई निर्णयाक निष्ठेने असते. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात नियमबाह्य नाही. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा. असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.