मुंबई – आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता नवाब मालिक यांना एक धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा फोन राजस्थानमधून केल्याचेही पुढे आले आहे.
दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नवाब मलिकांना दिली आहे.नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी 7.15 दरम्यान हा फोन आला असून सुरेश हुडा, असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला असे नवाब मलिक म्हणतात.
राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे.
दोन्ही ठिकाणी तुमचीच सरकारे आहेत. करा कारवाई. कसली वाट बघतात?
की फक्त तमाशा करताय. pic.twitter.com/svLVGWZo1Y— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 22, 2021
दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला असे नवाब मलिक म्हणतात.राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे. दोन्ही ठिकाणी तुमचीच सरकारे आहेत. करा कारवाई. कसली वाट बघतात? की फक्त तमाशा करताय असा टोमणा भातखळकर यांनी मारला आहे.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao