Suryakumar Yadav |भारताने इंग्लंडवर दोन गडी राखून रोमांचक विजय मिळवला आणि 20-20 क्रिकेट मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 165 धावा केल्या, पण भारताने शेवटच्या षटकांपर्यंत संघर्ष करत या लक्ष्याचा पाठलाग केला आणि विजय मिळवला.
यामध्ये टिळक वर्माच्या उत्कृष्ट खेळीने भारताला खूप मोठा आधार दिला. त्याने 55 चेंडूत 72 धावांची खेळी केली, ज्यात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. टिळक वर्माने आपल्या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.टिळक वर्माची ही खेळी केवळ भारतासाठीच नव्हे, तर त्याच्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरली आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने टिळक वर्माच्या खेळीचे कौतुक करत म्हणाले, “टिळक वर्मा ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने जबाबदारी स्वीकारताना पाहून बरे वाटले. त्याची खेळी आणि त्याची मानसिकता खरंच प्रेरणादायी आहे.”
सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) पुढे सांगितले की, “विजयासाठी संघातील खेळाडूंनी पुढे येऊन छोट्या-छोट्या भागीदारी केल्या ज्यामुळे आम्ही विजय मिळवू शकलो. आम्ही आक्रमक क्रिकेट खेळत आहोत आणि त्याच धर्तीवर खेळत राहू.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली, पुढील ४ दिवसांचे सर्व दौरे रद्द
राष्ट्रपती मुर्मू ९४२ कर्मचाऱ्यांना पोलिसांना पदकांनी सन्मानित करतील, ज्यात ९५ शौर्य पदकांचा समावेश
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्या; Supriya Sule यांची मागणी