प्रेमात न पडणाऱ्या लोकांना देखील प्रेमात पडायला लावणारा चित्रपट तिरसाट

पुणे – अँटमगिरी या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे (Director Pradip Tonge ) आणि मंगेश शेंडगे (Mangesh Shendage) आता तिरसाट हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून येत्या २० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच (Poster launched via social media) करण्यात आलं.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं (Dinesh Kirve’s Class One Films) तिरसाट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे( AD.Umesh Shedage) हे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केल आहे. नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज सूर्यकांत( Neeraj Suryakant) आणि तेजस्विनी शिर्के (Tejswini Shirke) ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. रिफ्रेशिंग अशा या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.