‘महिलांना दरमहा अडीच हजार अर्थसहाय्य देवू म्हणणारी TMC स्वतःच्या बंगलामध्ये ५०० रुपये देते’

म्हापसा – म्हापसा विधानसभा निवडणुकीची बार्देशमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ठिकाणी मुख्य लढत भाजपचे आमदार जोशुआ डिसुझा विरुद्ध कॉंग्रेसचे सुधीर कांदोळकर यांच्यात होत आहे. या निवडणुकीत आप,तृणमूल,शिवसेना आणि अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने रंगतदार लढत होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपच्या महिला मोर्च्याच्या अध्यक्षा रोषण नाईक यांची भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. भाजपचा महिला मोर्चा नेमका कश्या पद्धतीने प्रचार करतोय याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, गेली २० वर्षे मी भाजपचे कार्य करत आहे. निवडणुकीसाठी सध्या घरोघरी प्रचार करताना लोकांचा प्रचंड पाठींबा मिळत आहे. आम्ही सध्या प्रत्येक घरातील महिलांशी संवाद साधतोय तसेच महिलांना जाणीव करून देतोय कि भाजपचे सरकार येणे हे का आवश्यक आहे. आम्ही भाजप महिलांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची आठवण करून देत असतो. त्यात गृहआधार योजने अंतर्गत दर महिना गृहिणींना दीड हजार दिले जातात. दयानंद निराधार योजने अंतर्गत विधवा महिलांना दर महिना पेन्शन दिली जाते. तसेच लाडली लक्ष्मीअंतर्गत लग्न झालेल्या मुलीला एक लाख रुपयांची मदत केली जाते याबाबत आम्ही माहिती देत आहोत.

त्या म्हणाल्या, या सर्व योजनांचे महत्व महिलांना जाणवते त्यामुळे जर भाजपचे सरकार आले नाही तर या योजना बंद होऊ शकतात अशी भीती त्यांना वाटते. या योजना प्रत्यक्ष कार्यरत आहेत तसेच जे बाहेरील पक्ष जे यंदा गोव्यात आलेले आहेत ते लोकांना भूलथापा मारत आहेत महिलांनी त्यांच्या खोट्या आमिषांना तसेच भूलथापांना बळी पडू नये. महिलांना दरमहा अडीच हजार अर्थसहाय्य देवू म्हणणारी TMC स्वतःच्या बंगलामध्ये ५०० रुपये देतात. तेव्हा अश्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन आम्ही करतो. विशेष म्हणजे लोकांना देखील ते पटते.

केजरीवाल यांचे फुकट वीज देण्याचे आश्वासन ही देखील थाप कशी आहे हे आम्ही लोकांना पटवून देतो. लोकांना फुकट देणारे सरकार नको असून लोकांना स्वावलंबी बनवणारे सरकार हवे आहे. म्हणून महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये. इथल्या मातीत रुजलेला भाजपा हाच खऱ्या अर्थाने लोकांच्या अडचणी समजवून घेणारा पक्ष आहे यामुळेच भाजपचे या भागातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांना निवडून द्यावे.