शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.26:- आगामी दिवाळी उत्सवानिमित्त मावळ व मुळशी तालुक्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने मिळण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे. हे परवाने मावळ व मुळशी तालुक्यातील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी असतील.

परवान्यासाठी अर्जासोबत 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत नोंदणी उतारा अथवा जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधिताचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेले संमतीपत्र, पोलीस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक यांचे दंड किंवा शिक्षा झाली आहे का याबाबतचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगर पालिकेने दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षी तात्पुरता फटाका स्टॉल परवाना घेतला असल्यास त्याची प्रत तसेच परवाना शुल्क सहाशे रुपये शासकीय कोषागारात जमा करुन त्याचे मुळ चलन अर्जासोबत जोडावे.

शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत ही 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू नये. राहिलेला माल कायम स्वरुपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, स.नं.23, बावधन बु. ता. मुळशी (जि. पुणे) यांच्यामार्फत हे परवाने देण्यात येणार आहेत.

दुकानांच्या परिसरात सुरक्षितता बाळगा

शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये, तसेच दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारुकाम करु नये, फटाके उडवू नयेत. शोभेच्या दारुचे रॉकेट परीक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेशही उप विभागीय दंडाधिकारी मावळ-मुळशी यांनी दिले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=lbCAx3D6bzQ&t=110s

Previous Post
'या'  चित्रपटाने पटकावला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

‘या’ चित्रपटाने पटकावला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

Next Post
two wheeler

दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका, आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts
RBI

देशातील विविध बँकांमध्ये 48,262 कोटी रुपये आहेत पडून, कोणीही दावेदार नाही, कुणी वारसही नाही

नवी दिल्ली- अनेक बँकांना अशा समस्येचा सामना करावा लागतो, जेव्हा बँक (Bank) खात्यांमध्ये पडलेल्या रकमेचा हक्क कोणालाच मिळत…
Read More

तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते – फडणवीस

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल…
Read More
Ramesh Chennithala | मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरतायत, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे

Ramesh Chennithala | मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरतायत, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे

Ramesh Chennithala | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते.…
Read More