गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना मोठा धक्का 

रायगड – राज्यातील 1079 ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा निर्णय आज लागणार आहे. 18 जिल्ह्यातील 1 हजार 166  ग्रामपंचायतींपैकी 87 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे 1 हजार 79 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. याच निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असून यात शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगवाले यांना ग्रामस्थांनी धक्का दिलाय.

भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. येथे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमदेवाराचा पराभव झाला. काँग्रेस समर्थक चैतन्य महामुनकर हे विजयी झाले आहेत.

भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.