पैहचान कौन ? नितेश राणेंचा नेमका रोख कुणाकडे ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दाऊद सोबत मलिक यांचे नाव आलेले असताना शिवसेना चक्क मलिक यांचा बचाव करताना दिसून येत आहे.

दरम्यान, एकाबाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजप नेते नितेश राणे यांनी केलेले एक ट्वीट लक्ष्यवेधी ठरले आहे. या ट्वीटमध्ये एक डुक्कर जाळीत पकडले जात असल्याचा फोटो राणे यांनी ट्वीट केला आहे. या फोटो सोबत पैहचान कौन ? असा उल्लेख केला आहे.