आज बुडणाऱ्या जहाजाच्या कप्तानाची हतबलता दिसली; निखील वागळे यांचा प्रहार

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात (Crisis on Uddhav Thackeray government) सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले.

दरम्यान,  माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव ऐकलं. फेबूवर बोलताना दिसणारी भावनाशीलता आमदारांशी वागताना दिसली असती तर चित्र वेगळं असतं.आज दिसली ती बुडणाऱ्या जहाजाच्या कप्तानाची हतबलता!असं वागळे यांनी म्हटले आहे.