Toilet Seat | रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहे किती घाणेरडी असतात हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल. ही स्वच्छतागृहे स्वच्छ असल्याचे अनेक दावे रेल्वेकडून केले जात असले तरी बहुतांश स्थानकांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे वास्तव आहे. आता जरा विचार करा जर कोणी या टॉयलेटमध्ये जाऊन टॉयलेट सीट (toilet seat) जिभेने चाटू लागला तर? होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जर्मन नेता असेच घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना उलट्या झाल्यासारखे वाटू लागले.
https://twitter.com/EndWokeness/status/1790855326801039475
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा जर्मन नेता कसा टॉयलेट सीट चाटतोय आणि मग तो टॉयलेट क्लिनिंग ब्रशही (Toilet cleaning brush) चाटायला लागतो. या जर्मन नेत्याचे नाव मार्टिन न्यूमायर असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये त्याने हे घाणेरडे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.
व्हिडीओ पाहून असे वाटते की त्याने स्वतःचा व्हिडिओ देखील बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कसा पोहोचला हे अद्याप समोर आले नसले तरी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचे नामांकन रद्द करण्यात आल्याचे निश्चितपणे सांगितले जात आहे. ते फ्री डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप