गुडन्यूज! भारतातला पहिला ट्रान्समेल बाबा, केरळच्या तृतीयपंथी दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्ती

Kerala Trans Couple: केरळचे ट्रान्सकपल जहाद फाजील (Zahhad Fazil) आणि जिया पावल (Ziya Paval) यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे आपण आई-बाबा बनल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच या तृतीयपंथी जोडप्याने त्यांचे काही फोटो शेअर करत गरोदरपणाची बातमी दिली होती. आता त्यांना पुत्ररत्न प्राप्ती (Kerala Trans Couple Blessed With Baby Boy) झाली आहे. ट्रान्समॅनने बाळाला जन्म देण्याची भारतातील ही पहिलच घटना आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

जिया पावलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बाळाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. जिया व जहादचं बाळ सुखरूप व तंदुरुस्त असल्याची माहिती जियाने पोस्टद्वारे दिली आहे. “आज (८ फेब्रुवारी) सकाळी ९.३७ मिनिटांनी आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आमचा आनंद गगनात मावत नाहीये. आनंदाश्रूंनी डोळे भरुन आले आहेत. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सगळ्यांचे आभार”, असं झजियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. जहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. या ट्रान्स दाम्पत्याने ठरवले आहे की, मुलाला दूध डेअरीतून आईचे दूध पाजले जाईल. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान जहादचे स्तन काढण्यात आले होते. जरी तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत. यामुळे तिला आता गर्भधारणा करता आली आहे. आता जहाद बाळाला जन्म देणारा भारतातील पहिला ट्रान्समॅन बनला आहे.