एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा अल्टीमेटम

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे (MSRTC) विलीनीकरण राज्य शासनामध्ये करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. सरकारकडून अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य होत नाही. राज्य सरकारकडून अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना बुधवारी एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्री परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहे.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाननंतर आता सरकारकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील कठोर कारवाई केली जात असल्याचं दिसतं आहे. संपावर असलेल्या 2 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काल हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती.

दरम्यानन, आता अनिल परब यांनी एक मोठी घोषणा केली आहे.एसटी कर्मचारी कामवर हजर न झाल्यास 2016-17 च्या भरतीमधील प्रतिक्षा यादीतील लोकांना भरती करून घ्यावे लागेल असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं आहे.