पुणे | पुण्यातील खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, वरदाडे व परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांना (Tribal Katkari citizen) हक्काचा पक्का निवारा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात हे नागरिक स्वतःच्या हक्काच्या घरात राहू शकतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी दिले.
याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे, आणि लवकरच सर्व कातकरी नागरिकांना (Tribal Katkari citizen) हक्काची जागा मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांची आधार नोंदणी बंद केली होती. मात्र आता प्रशासनाने तातडीने कॅंप लावून सर्वांचे आधार कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
तत्पुरत्या उपाययोजनांमुळे आदिवासी कातकरी नागरिकांच्या समस्या कायम सुटत नाहीत. त्यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून, त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळत आहेत की नाही, याची नोंद ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुण्यातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयांवर नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महायुती सरकारमध्ये वाद! एकनाथ शिंदें का सुरू करणार आहेत स्वतःचे वैद्यकीय मदत केंद्र
“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भाजपचे लोक”, संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबईत कोळसाभट्टीवरील तंदूर रोटीवर बंदी, BMCची कडक कारवाईचा इशारा