ट्रोलर्सनी केल्या सर्व सीमा पार; निखील वागळे यांना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट केली व्हायरल 

 Mumbai – जेष्ठ पत्रकार निखील वागळे हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी मांडलेल्या भूमिकांवरून अनेकदा वाद देखील निर्माण झालेला आहे. त्यांच्या भूमिका आणि विचार न पटल्याने अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र यावेळी ट्रोल करणाऱ्या मंडळींनी सर्व सीमा पार केल्याचे दिसून येत आहे.

सोशल मिडीयावर सध्या वागळे यांचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोत वागळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. याबाबत स्वतः निखील वागळे यांनी एक पोस्ट केली असून या पोस्ट खाली संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी वागळे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी वागळे यांनाच खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान,यापूर्वी काही धमक्या देखील वागळे यांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील पोलीस प्रशासनाने त्वरित या अशा ट्रोल करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.