पंकजा मुंडे या अभ्यासू नेत्या आहेत मात्र सुप्रियाताई…; तृप्ती देसाईंचा घणाघात 

पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर फेसबुक पोस्ट (Facebook post) केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  नुकतेच केतकी चितळे  हिला तीन दिवसाची पोलिस कस्टडी दिल्यानंतर  पुन्हा कोर्टात सादर केले होते यावेळी कोर्टाने केतकी चितळे तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एका बाजूला या घडामोडी घडत असताना आता केतकीच्या वयाचा आणि आणि सगळ्या बाबींचा विचार करता तिला वॉर्निंग देऊन या गोष्टींना पूर्णविराम द्यायला हवं, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे. एखाद्याने सोशल मीडियावर (Social Media) काय लिहावं हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. टीकासुद्धा अशी करावी, ज्यात बीभत्सपणा नसावा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

आम्ही लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, लोक पेपरमधून लिहायचे. तरीसुद्धा काहीवेळा भाषा घसरायची. आम्ही मुंडे साहेबांना तेव्हा विचारायचो की, हे कसं सहन करता? त्यावर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असं ते सांगायचे. पण आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या वेगळ्या पद्धतीने केली जात आहे, असं म्हणताना पंकजा यांनी केतकीच्या वयाचा विचार करून तिला वॉर्निंग देऊन या गोष्टी संपवाव्यात असं म्हटलं.

पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या या मतावर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, केतकी चितळेच्या वयाचा विचार करता या सर्व गोष्टी संपवायला हव्यात, पवार साहेब मोठे नेते आहेत असे म्हणणाऱ्या पंकजाताई मुंडे किती अभ्यासू आहेत ते कळतंय परंतु दुसरी बाजू पाहता पवारसाहेबांच्या कन्या सुप्रियाताई मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतानाच दिसत आहेत.

सुप्रियाताईंनी स्वतःहून अशी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात त्यांना अजून आदराचे स्थान वाढले असते. पंकजाताईंनी एक महिला म्हणून एका महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दाखवला आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात अजूनच आदर वाढला आहे