राज्य महिला आयोगाचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी महिला आयोग’ करा – तृप्ती देसाई

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाची वाटचाल’ या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात (Balgandharva Hall) स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.  या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

यावरून राज्य महिला आयोग (State Women’s Commission) देखील सक्रीय झाला असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना (Pune Police) देण्यात आले आहेत. असे ट्विट (Tweet) राज्य महिला आयोगाने केले आहे.

यावरून आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी राज्य महिला आयोगाला टोमणा मारला आहे.  देसाई म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. असा निशाणा साधत त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कामावर टीका केली आहे.