स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा – Ajit Pawar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा - Ajit Pawar

Ajit Pawar | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

गुरुवारी नांदेड जिल्हयातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्हयात आणि शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल असे आश्वासनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

पक्षाचे कार्यकर्ते कामात हालते ठेवले पाहिजे त्यापध्दतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घेत असतो हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फोफाटयात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कचरा काढून टाकला पाहिजे, सैफवर खरंच चाकूने वार झाले की अभिनय करत होता – Nitesh Rane

श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करण्याऐवजी बाळासाहेबांना भारतरत्न द्या – Sanjay Raut

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

Previous Post
"शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, दिलेली आश्वासने पूर्ण करणार"

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, दिलेली आश्वासने पूर्ण करणार”

Next Post
शिवसेनेवर टीका करणारी तोंडे बंद झाली नाही तर आगामी काळात 20 चे 2 व्हायला वेळ लागणार नाही

शिवसेनेवर टीका करणारी तोंडे बंद झाली नाही तर आगामी काळात 20 चे 2 व्हायला वेळ लागणार नाही

Related Posts
अंगणवाडी सेविकांना १५  हजार तर मदतनीसांना १०  हजार मानधन देण्याचे औदार्य सरकारकडे आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

अंगणवाडी सेविकांना १५  हजार तर मदतनीसांना १०  हजार मानधन देण्याचे औदार्य सरकारकडे आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई   – राज्यसरकारने अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे घेण्यासाठी १२ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार…
Read More
शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही - पडळकर 

शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही – पडळकर 

 सांगली – २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी मोठं विधान केलं…
Read More
महायुतीत धुसफूस : कवाडे गटाला महायुतीमध्ये घेतल्याने आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष नाराज

महायुतीत धुसफूस : कवाडे गटाला महायुतीमध्ये घेतल्याने आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष नाराज

मुंबई – भाजप शिवसेनेची युती होती रिपब्लिकन पक्ष त्यात सामील झाल्यापासून युतीची महायुती झाली आहे.शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती…
Read More