चोरीच्या ०३ मोटारसायकल व मोबाईलसह आरोपी अटकेत

तुळजापूर – पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकामी शनिवार दि. २५ रोजी उस्मानाबाद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहीती आधारे, कोंड ता. जि. उस्मानाबाद येथील अक्षय बाळू शिंदे याच्या घरी छापा मारला असता त्याच्या घरात एकूण ०३ मोटारसायकल व ०१ मोबाईल सापडले आहेत.

या बाबतीत अधिक माहीती अशी की कोंड ता. जि. उस्मानाबाद येथे अक्षय बाळू शिंदे याचा शोध घेतला असता कोंड शिवारातील शेतामध्ये सापडला आहे. त्याच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली असता त्याचे घरात एकूण ०३ मोटारसायकल व ०१ मोबाईल मिळाला. सदर मोटारसायकली व मोबाईलबाबत माहिती घेतली असता मोबाईल चोरीबाबत उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे, तर इतर ०३ मोटारसायकल विषयी माहिती घेतली असता त्या चोरी झालेबाबत शिराढोण पोलीस ठाणे, सोलापुर जिल्हातील सोलापुर तालुका व पांगरी पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

दर आरोपी नामे अक्षय बाळू शिंदे, वय २३ वर्षे, रा.सुंबा हल्ली रा. कोंड, ता. जि. उस्मानाबाद यास ०३ दुचाकी मोटारसायकल व ०१ मोबाईल असा एकूण १,४६,०००/-रु चा मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि – यशंवत जाधव, सपोनि – शैलेश पवार, पोउपनि संदिप ओहोळ, पोहका-विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, मेहबुब अरब, पोना- नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर या पथकाने केली आहे.