‘देवेंद्रजींचं ‘वजन’ किती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण तुमचं तर कुठेच ‘वजन’ नाही हे आता महाराष्ट्राला कळालंय’

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) ,बाबरी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्यासाठी आपण अयोध्येत (Aypdhya) उपस्थित असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, तर तुमच्या वजनाने ती खाली पडली असती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच शिवसैनिकांनी (Shivsainik) बाबरी पाडली, त्यामुळे त्यांना अभिमान वाटतो, असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने (BJP) देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी पलटवार केला आहे. भोसले म्हणाले, देवेंद्रजींचं ‘वजन’ (Weight) किती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण तुमचं तर कुठेच ‘वजन’ नाही हे आता महाराष्ट्राला कळालंय उद्धवजी ! असं भोसले यांनी म्हटले आहे.