काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे समाजात भ्रम निर्माण होऊन भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या न्यायालय व पोलीस दलाबाबत चीड व साशंकता निर्माण होते. त्यामुळे मी आपल्याला कायदेशीर नोटीस बजावत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तुषार दमगुडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तुषार दमगुडे म्हणाले, “हुतात्मा हेमंत करकरे यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केली” असे बेताल वक्तव्य नुकतेच विजय वडेट्टीवार यांनी केले. मुंबई हल्ल्याचा तपास पूर्ण होऊन त्यातील आरोपींना फाशी झाली आहे याची आपल्याला कल्पना आहे. तरी,आपल्या वक्तव्यामुळे समाजात भ्रम निर्माण होऊन भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या न्यायालय व पोलीस दलाबाबत चीड व साशंकता निर्माण होते. आपण कुणी सामान्य व्यक्ती असता तर याकडे दुर्लक्ष देखील करता आले असते परंतु आपण राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच विधी मंडळात गोपनीयता राखण्याची, जातीय-धार्मिक आधारावर पक्षपात न करण्याची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या वक्तव्य व हेतुकडे दुर्लक्ष करता येत नाही.
प्रति
विजय वडेट्टीवार
(विरोधी पक्षनेते -महाराष्ट्र राज्य)"हुतात्मा हेमंत करकरे यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केली" असे बेताल वक्तव्य नुकतेच तुम्ही @VijayWadettiwar केले. मुंबई हल्ल्याचा तपास पूर्ण होऊन त्यातील आरोपींना… pic.twitter.com/7h1cDaYAqW
— Tushar Damgude (@damgude_tushar) May 14, 2024
तरी माझे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांच्या तर्फे मी आपल्याला कायदेशीर नोटीस बजावत आहे. त्यावर १५ दिवसांत उत्तर न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा तुषार दमगुडे यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप