अवघ्या काही सेकंद अन् 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त, पाहा व्हीडिओ…

नोएडा –  नोएडाच्या सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर सीरियल ब्लास्टिंगने (Noida Supertech Twin Towers) जमीनदोस्त करण्यात आले आहेत. स्फोटानंतर धुराचे लोट उठले आणि परिसरात फक्त धुराचे लोट दिसत होते. दोन्ही टॉवरमध्ये सुमारे 3,700 किलो स्फोटके वापरण्यात आली होती. (twin towers demolition video )

नोएडा अथॉरिटीच्या सीईओ रितू माहेश्वरी (Noida Authority CEO Ritu Maheshwari) म्हणाल्या की, ठरल्याप्रमाणे हे घडले आहे. स्फोटानंतर काही मलबा रस्ता आणि एटीएसच्या भिंतीकडे गेला, असे त्यांनी सांगितले. इमारत कोसळल्यानंतर धुळीचे लोट तयार झाले होते. ट्विन टॉवर्सजवळील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना संध्याकाळी 6.30 नंतर घरात प्रवेश दिला जाईल. स्वच्छता केली जाईल. गॅस पुरवठा आणि वीजही लवकरच पूर्ववत होईल.सुमारे 650 पोलीस, 100 राखीव दलाचे कर्मचारी, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.

खबरदारी म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकरही तेथे पाचारण करण्यात आले. एमराल्ड कोर्ट सोसायटी कॉम्प्लेक्सच्या मधोमध असलेले हे बांधकाम नियमांचे उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बजावल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक एमराल्ड कोर्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये 2009 पासून ‘अपेक्स’ (32 मजले) आणि ‘सायन’ (29 मजले) टॉवर्सचे बांधकाम सुरू होते.