दोन बाईकस्वार जॉनच्या मागे धावू लागले; पण का?

मुंबई : डॅशिंग जॉन अब्राहम रियल लाइफमध्ये अनेकदा त्याच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त वेगवेगळ्या कारणांमुळेही चर्चेत असतो. सध्या जॉन अब्राहमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जॉनच्या या व्हिडीओवरच युजर्सच्या नजरा खिळल्या आहेत. या व्हिडिओमध्ये जॉन अब्राहम बाईक चालवणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर धावताना दिसत आहे.

जॉनच्या व्हिडिओने इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाईकवर दोन व्यक्ती व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यांच्या मागे अभिनेता जॉन अब्राहम आपले केस ठीक करताना दिसत आहे. दरम्यान, जेव्हा जॉनची नजर व्हिडिओ बनवणाऱ्यावर पडते, तेव्हा तो घाईघाईने येतो आणि त्या व्यक्तीचा फोन हिसकावून वेगाने निघून जातो.

डॅशिंग जॉन अब्राहम रियल लाइफमध्ये अनेकदा त्याच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त वेगवेगळ्या कारणांमुळेही चर्चेत असतो. सध्या जॉन अब्राहमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जॉनच्या या व्हिडीओवरच युजर्सच्या नजरा खिळल्या आहेत. या व्हिडिओमध्ये जॉन अब्राहम बाईक चालवणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर धावताना दिसत आहे.

जॉन अब्राहमचे असे वागणे पाहून बाईक चालवणा-यांना सुद्धा नेमकं काय घडलं हेच कळाले नाही. बाईक सोडून दोघेही जॉनच्या मागे धावू लागतात. आता आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण जॉन अब्राहमने त्याच्या फॅन्ससोबत नुकताच एक प्रँक केला होता. व्हिडिओमध्ये “हॅलो, कसे आहात?” जॉनने त्याच्या फॅन्सचा फोन हिसकावून घेतला. यानंतर, पुन्हा सेल्फी कॅमेराकडे बघत तो म्हणाला, “हॅलो, तुम्ही ठीक आहात का? हा माझा मित्र आहे.” यानंतर त्याने फोन परत फॅनला दिला.

व्हिडिओ पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते जॉनचे कौतुक करत आहेत, तो खूप नम्र आहे, चाहत्यांना जॉनचा हा फनी अंदाज प्रचंड भावला आहे. जॉन एक उत्तम अभिनेता आहे म्हणत युजर्स कमेंट करत आहेत. जॉनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, जॉन अब्राहम लवकरच अभिनेत्री दिव्या खोसलासोबत ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यमेव जयते 2’ हा 2018 च्या सुपरिहट अक्शन चित्रपटाचा सिक्वेल आहे, या चित्रपटात जॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like