हडपसर | गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर (Hadapsar Criminals arrested) येथील वैभव टॉकीज परिसरात कारवाई करून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. हे दोघे ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते.
अटक आरोपींची नावे धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) अशी असून, दोघेही दिघी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात मकोका, एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्याखाली गुन्हे दाखल (Hadapsar Criminals arrested) आहेत. त्यांच्यावर दरोड्याची तयारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही नोंद आहेत.
शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदार कोंबिंग ऑपरेशन करत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना या आरोपींबाबत माहिती मिळाली. दिघी पोलिसांच्या रेकॉर्डवरील हे दोघे गुन्हेगार हडपसरमधील वैभव टॉकीज येथे ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी आल्याचे समजले.
सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि भादा व भोंड या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, कीर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण